

Flight Safety
sakal
छत्रपती संभाजीनगर : एखादे विमान सुरक्षितपणे उड्डाण करते आणि आपल्या निश्चित स्थळी पोचते तेव्हा त्यामागे आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल वैमानिकांसोबतच एक अत्यंत महत्त्वाचे विज्ञान असते. यालाच विमानन हवामानशास्त्र म्हणतात. हवामानशास्त्राची ही एक विशिष्ट शाखा आहे. उड्डाणाच्या आधी व दरम्यान आकाशातील बदलत्या हवामान परिस्थितींचा सखोल अभ्यास यात केला जातो, असे हवामानतज्ज्ञ राजेश कुमार यांनी सांगितले.