छत्रपती संभाजीनगर : अयोध्यानगर नाव ऐकले की वाटते या ठिकाणी रामराज्य असेल. सिमेंट रस्ते, पथदिवे, चकाचक वसाहती, मोठमोठ्या शिक्षण संस्था, बजरंग चौक पाहून खरोखरच आपण रामराज्याकडे चाललो की काय याची प्रचिती येते. .पण, जसे आपण अयोध्यानगरीत शिरतो आणि फक्त दहा फूट अंतरावर जातो, तोच तुमच्या शरीराला कमरेपासून मानेपर्यंत झटका देतो तो पहिला खड्डा. आणि येथूनच सुरू होतो वॉर्डातील समस्यांचा प्रवास..आठ वसाहती, पाच सोसायट्यांसह साडेआठ हजार लोकसंख्येचा हा अयोध्यानगर वॉर्ड आहे. पाणी, वीज, कचरा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, अस्वच्छता, डास, माशा, कुत्र्यांचा संचार, नशाखोरी अशा दहातोंडी रावणरूपी समस्यांच्या कचाट्यात येथील जनता सापडली आहे..Chh. Sambhaji Nagar News : रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेचे उंटावर आंदोलन!.रामलीला मैदानावर अस्वच्छता पसरली. वॉकिंग ट्रॅक नाहीसा झाला आहे. या रामलीला मैदानाच्या संरक्षण भिंती तुटल्या असून, भिंतींच्या चारही बाजूंनी अस्वच्छता आहे..स्वच्छतागृहांची दुरवस्थाराष्ट्रमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. त्या ठिकाणी छोटेखानी जलतरण तलाव तयार करण्यात येत आहे. या तलावाचे काम अत्यंत संथ चालू आहे. या उद्यानाच्या बाहेर असलेल्या स्वच्छतागृहाचीही दुर्दशा झाली. प्रत्येक चौकात अस्वच्छता, उखडलेले रस्ते, अनेक ठिकाणी रस्ते नव्हे, तर पेव्हर ब्लॉक टाकून ठेवलेले आहेत. चौकाचौकांत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.