आंबेडकर यांचे सेवेकरी शिवराम जाधव यांचे निधन, बाबासाहेबांच्या सेवेची संधी

शिवराम जाधव यांचे मामा किसन कांबळे हे बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते होते. बाबासाहेबांनी औरंगाबादच्या मिलिटरी छावण्या भाड्याने घेऊन मिलिंद महाविद्यालय सुरू केले आणि मुलांना जेवणासाठी खाणावळही सुरु केली.
शिवराम आनंदा जाधव
शिवराम आनंदा जाधव

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Babasaheb Ambedkar) सेवेकरी शिवराम (मामा) आनंदा जाधव (वय ९२) (Shivram Ananda Jadhav) यांचे छावणी मधील गड्डीगुडम येथे राहत्या घरी रविवारी (ता. सोळा) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे. (Babasaheb Ambedkar's Aid Shivram Jadhav Passes Away)

शिवराम आनंदा जाधव
'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशाचे ऐक्य, प्रगती धोक्यात'

बाबासाहेबांच्या सहवासाने धन्य झालो, सांगितली होती आठवण

शिवराम जाधव यांचे मामा किसन कांबळे हे बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते होते. बाबासाहेबांनी औरंगाबादच्या मिलिटरी छावण्या भाड्याने घेऊन मिलिंद महाविद्यालय (People Education Society's Milind College) सुरू केले आणि मुलांना जेवणासाठी खाणावळही सुरु केली. त्या खाणावळीचा ठेका शिवराम यांच्या मामाकडे होता. शिवराम खाणावळीत वाढपी म्हणून काम करत. बाबासाहेब जेव्हा औरंगाबादला येत तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक मेहनती व्यक्तीची गरज होती. त्यावेळी बाबासाहेबांचे अंगरक्षक पैलवान रुंजजी (मामा) भारसाखळे यांनी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य म. नि. चिटणीस यांनी शिवराम यांना बाबासाहेबांच्या सेवेसाठीची संधी दिली. १८ मार्च १९५३ शिवराम हे बाबासाहेबांच्या सेवेत रुजू झाले. बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी त्यांना जवळपास चार-पाच वर्षे अधून-मधून मिळाली. जाधव हे बाबासाहेबांच्या घरी त्यांची खोली, लिखाणाचे साहित्य, ग्रंथ आणि इतर वस्तू यांची व्यवस्था पाहत. त्यानंतर मिलिंदमध्ये शिपायाची नोकरी करुन शिवराम जाधव यांनी १९९४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली.

परिवर्तनासाठी मारली थापड

शिवराम जाधव यांनी पाच वर्षापुर्वी सांगीतलेली अठवण : एकदा बाबासाहेबांचे रात्रीचे जेवण झाले आणि ते हात धुण्यासाठी बाजूला गेले. दरम्यान, माईसाहेबांनी मला प्लेट उचलण्यास सांगितले. प्लेटमध्ये उरलेले अन्न टाकून देणे चांगले वाटले नाही, म्हणून मी त्याचा एक घास तोंडात टाकला. हे लक्षात आल्यानंतर रागाच्या भरात बाबासाहेबांनी माझ्या कानाखाली दिली. दोन दिवस मी कामाला आलो नाही, त्यानंतर बाबासाहेबांनी वडिलांसह मला बोलावून घेतले. त्यानंतर सांगीतले की, मी कशासाठी धडपड करतोय, उष्टे अन्न खाणे, जुन्या चालीरीती नष्ट करणे, हे ध्येत आहे, म्हणूनच शिवराममध्ये परिवर्तन व्हावे यासाठी त्याला थापड मारली. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या निधनाची माहिती प्राचार्य चिटणीस यांना देण्याची जबाबदारी माईसाहेबांनी फोन करून मला दिली होती, ही आठवण जाधव यांनीच सांगीतली होती. बाबासाहेब श्री. जाधव यांच्या घरी आले होते, ती खोली आणि बाबासाहेबांनी जेवण केलेला टेबल श्री. जाधव यांनी आजही जतन करून ठेवलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com