

Knife Attack
sakal
छत्रपती संभाजीनगर : किराणा दुकानात बसलेल्या पत्रकारावर एकाने चाकूहल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. २३) सायंकाळी बायजीपुरा परिसरात घडली. यात वार चुकवल्याने पत्रकार थोडक्यात बचावले. एवढ्यावर न थांबता हल्लेखोराने चाकूच्या धाकावर किराणा दुकानातील गल्ल्यातून पैसेही काढले. गजबजलेल्या वसाहतीतील या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हल्ला करणारा नशेखोर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.