Crime
sakal
बजाजनगर, : एएस क्लब परिसरातील उड्डाणपुलावरून उडी घेत १८ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत तिच्या तरुणीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून चेहरा व जबड्यालाही दुखापत झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.