बाळासाहेब थोरातांचे चुलते कर्नल पंडितराव थोरात यांचे निधन |Panditarao Thorat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panditarao Thorat
बाळासाहेब थोरातांचे चुलते कर्नल पंडितराव थोरात यांचे निधन

बाळासाहेब थोरातांचे चुलते कर्नल पंडितराव थोरात यांचे निधन

लोहगाव (जि.औरंगाबाद) : शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्याच्या जनचळवळीचे खंदे सेनापती व प्रसिद्ध उद्योजक व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे चुलते कर्नल पंडितराव संतुजी थोरात (Panditarao Thorat) (वय ८१) यांचे शुक्रवार (ता.१२) पहाटे औरंगाबाद येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर लोहगाव परिसरातील मुलानीवाडगाव (ता.पैठण,जि औरंगाबाद) (Aurangabad) येथील सोना फार्मच्या शेतीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, रणजित, इंद्रजित थोरात, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील मूळ रहिवासी असलेले पंडितराव (तात्या) यांनी देशाच्या सेना दलात सेवा केली.

हेही वाचा: राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवणार ?

त्यानंतर औरंगाबाद, बिडकीन येथे सर्वसामान्य ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला कमी किमतीत दर्जेदार कपड्याचा सोना साबण कारखाना व मुलानीवाडगाव येथे जवळपास दोनशे पन्नास एकरावर आधुनिक तंत्रज्ञान स्वंयचलित, ठिबक सिंचन कमी पाण्यावर नैसर्गिक विषमुक्त शेती प्रयोगातून मोसंबी, केशर आंबा, ऊस, केळी, फळबाग उभारलेल्या व लोहगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शेती विद्यापीठ, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीर घेणारे, शेतीला वीज, पाणी आदी येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी, लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी पुढाकार व सहभागातून प्रश्नाची तड लावणारे, सतत शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या ध्यास घेतलेले (तात्याचा) आधारवड गेल्याने पंचक्रोशीतील शेतकरी, कामगारानी हळहळ व्यक्त केली आहे.

loading image
go to top