bamu
bamubamu

BAMU Sambhajinagar : धक्कादायक; झेरॉक्स दुकानदार चालवतायत मास कॉपीचं रॅकेट; गठ्ठ्यातून पेपर काढून...

कशा पद्धतीने ही मास कॉपी केली जात आहे? जाणून घ्या...

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पेपरचे रेट्सही ठरलेले असून व्यवहारांबद्दलची माहिती समोर आली आहे. फोटो स्टुडिओ, झेरॉक्स दुकानदारांकडून हे रॅकेट चालवल्याचं समोर येत आहे.

याबाबत एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी परिक्षेच्या वेळी विद्यार्थी कोरी पानं सोडतात आणि संध्याकाळी पुन्हा सविस्तरपणे पेपर लिहितात. हा सगळा प्रकार फोटो स्टुडिओ, झेरॉक्सच्या दुकानदारांकडून चालवला जात असल्याचं आढळून येत आहे. यामध्ये ३०० ते ५०० रुपयांमध्ये कॉपी पुरवण्यात येत आहे.

bamu
Sanjay Raut : चार महिन्यांपासून फडणवीस भेटणं टाळतायत; संजय राऊतांचा आरोप

शेंदरा या गावातल्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाच्या शेजारी हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. यामध्ये तिसऱ्या वर्षांचे पेपर ३०० रुपयांमध्ये दिले जात आहेत. या दुकानदारांकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांकही असल्याची माहिती आहे. पैसे दिल्याशिवाय हे दुकानदार पेपर देत नाहीत.

bamu
Maharashtra Politics : राहुल गांधींनंतर संजय राऊतांवरही मानहानीचा दावा; कारण मोदी नव्हे एकनाथ शिंदे

याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या रॅकेटमध्ये परिक्षेच्या वेळी विद्यार्थी आपला पेपर पूर्ण कोरा सोडतात. त्यानंतर त्याचे गठ्ठे बांधले जातात. संध्याकाळी पुन्हा काही वेळाने उत्तरपत्रिका गठ्ठ्यातून काढून विद्यार्थ्यांना दिल्या जातात. ३००-५०० रुपयांमध्ये विद्यार्थ्यांकडूनच तो पेपर लिहून घेतला जातो आणि पुन्हा या उत्तरपत्रिका गठ्ठ्यात ठेवून पेपर तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com