esakal | विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग,विद्यापीठाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग,विद्यापीठाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (Babasaheb Ambedkar Marathwada University) जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी विद्यार्थिनीसोबत अश्लील चॅटिंग केली. इतकेच नव्हे, तर प्रोजेक्ट रिपोर्टच्या कामासाठी शिंदेच्या कार्यालयात गेल्यानंतर विद्यार्थिनीला सतत मास्क काढून बस, असे म्हटले. रात्री अपरात्री ‘डोन्ट माईंड बट यू आर सो ब्यूटिफल’ यासारखे अनेक संदेश करत मानसिक त्रास दिल्याचे विद्यार्थिनीने तक्रारीत नमूद केले आहे. यावरून शिंदेंविरोधात गुरुवारी (ता.नऊ) बेगमपुरा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विद्यापीठातील एका विभागात पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विशाखा समितीकडे प्रथम तक्रार केली होती. त्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार विद्यार्थिनी एका प्रोजेक्टवर काम करत होती. त्यासाठी विद्यापीठासंदर्भातील (Aurangabad) माहिती घेण्यासाठी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी या नात्याने तिने शिंदे यांना फोन करून त्यांच्या भेटीची वेळ घेत २७ ऑगस्ट रोजी शिंदेच्या कार्यालयात गेली. दरम्यान तिला सारखे मास्क काढून बस, असे शिंदे सांगत होता.

हेही वाचा: औरंगाबादेतील विकासकामे गतीने पूर्ण करा - मुख्यमंत्री ठाकरे

काय केले होते मेसेजेस?

त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी शिंदे यांनी विद्यार्थिनीच्या व्हॉट्सॲपवर रात्री साडेदहाला ‘हाऊ आर यू डिअर..., प्लीज डोन्ट माइंड, बट यू आर सो ब्यूटिफूलॅ’ असा संदेश करत ‘पहिल्याच भेटीत मला नेहमीच खूप कमी माणसं आवडतात, तुझ्यासारखी सुंदर मुलगी मात्र मला मनातून आवडली, तुझं वय काय? २० की २५? त्यावर विद्यार्थिनीने ‘माझं वय ३४ आहे, मी विवाहित आहे, असे सांगितले असता, त्यानंतही रात्री साडेअकरापर्यंत ‘आय एम व्हेरी इम्प्रेस युवर नेचर, स्मार्टनेस, अॅटिट्यूड ॲण्ड पर्सनॅलिटी’ यासारखे संदेश पाठवून विद्यार्थिनीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून शिंदेविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स्वतः पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार करित आहेत.

loading image
go to top