esakal | औरंगाबादेतील विकासकामे गतीने पूर्ण करा - मुख्यमंत्री ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेतील विकासकामे गतीने पूर्ण करा - मुख्यमंत्री ठाकरे

औरंगाबादेतील विकासकामे गतीने पूर्ण करा - मुख्यमंत्री ठाकरे

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील विविध विकासकामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रकल्पांचे सादरीकरण गुरुवारी (ता. नऊ) ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण झाले, यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. सादरीकरणावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आमदार संजय शिरसाट, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Corona Updates : नांदेडकरांना दिलासा! केवळ दोघेच कोरोनाबाधित

पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत तसेच वसतिगृह तयार आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसेच त्यांच्या सहभागाने ट्रस्टची पुनर्रचना करावी. राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या संतपीठात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हे संतपीठ विद्यापीठ व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अधिक पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाच्या आवश्‍यकतेविषयी सादरीकरण केले. डीएमआयसी आणि ऑरिक सिटीमधील उद्योगाशी निगडित मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्तेमार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा: काकांच्या निधनाचे दु;ख, त्यात पुतण्याचा सापडला मृतदेह; एकाच दिवशी कुटुंबावर मोठा आघात

त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.पालकमंत्री देसाई, रोजगार हमी योजनामंत्री भुमरे, महसूल राज्यमंत्री सत्तार तसेच आमदार शिरसाट यांनी देखील विकासकामांसंदर्भात सूचना केल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी प्रगतिपथावरील तसेच विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले.

loading image
go to top