esakal | कोरोनाचा प्रभाव असलेल्या भागातील बँका आजपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रभाव असलेल्या भागातील बँका आजपासून बंद

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ वर गेली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानुसार कोरोना प्रभाव असलेल्या भागातील बॅंका २९ एप्रिल ते तीन मेपर्यंत बंद राहणार आहेत. या भागातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५० शाखा बंद राहणार आहेत, अशी माहिती अग्रणी बँकांचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी मंगळवारी (ता. २८) दिली. 

श्री. कारेगावकर म्हणाले, ‘‘बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या विषयाचे पत्र या ५० शाखांना पाठविण्यात आले आहे. या शाखांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाच शाखांचा समावेश आहे. महिलांच्या जनधन बचत खात्यात जमा झालेली ५०० रुपये काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या भागातील बॅंक राहणार बंद 
किलेअर्क, नूर कॉलनी, समतानगर, हिलाल कॉलनी (आरेफ कॉलनी), आसेफिया कॉलनी (आरेफ कॉलनी), बिस्मिल्ला कॉलनी, भीमनगर, बायजीपुरा, किराडपुरा या भागात कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. या भागातील सर्व सार्वजनिक बँकाच्या शाखा तीन मेपर्यंत बंद राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ज्या भागात कोविड-१९ चा प्रभाव जास्त आहे त्या भागातील सर्व बँकांच्या शाखा बुधवारपासून तीन मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. चार मेपासून नियमित बँका सुरू होणार आहेत. याविषयी सर्व शाखा व्यवस्थापकांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. 
- श्रीकांत कारेगावकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक 

loading image