esakal | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरून चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना मुक्तीकडे नांदेडची वाटचाल

मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे प्रशिक्षित आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरून चिंता

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेवरून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. यावर पालकमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांनी संभाव्य धोका पाहता संबंधित सर्व यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता.११) आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. बैठकीला खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel), डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad), आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde), अंबादास दानवे, रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector Sunil Chavan), अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे , महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन गर्दी होईल अशा ठिकाणी प्रतिबंध आणि काही बंधने त्याचप्रमाणे मास्क वापरण्याबाबत सूचना केल्या. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे प्रशिक्षित आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचे लसीकरणामध्ये योगदान असेच ठवावे, लसीकरण पूर्ण करण्याबाबत आरोग्य यंत्रणेने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा, उपलब्ध खाटांची संख्या, ऑक्सिजनचा पुरवठा आणि साठा, जिल्ह्यात झालेले लसीकरण, म्युकरमायकोसिसबाबतची सद्य:स्थिती, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजनाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. (Be Ready For Possible Third Wave Of Corona)

हेही वाचा: वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्याला दांपत्याकडून बेदाम मारहाण

लोकप्रतिनिधी म्हणाले...

खासदार इम्तियाज जलील यांनी म्युकरमायकोसिसच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दंतरोग चिकित्सकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. खासदार डॉ. कराड यांनी, बालकांच्या कोरोना प्रतिबंधासाठी व्हेंटिलेटर वापराचे प्रशिक्षण असलेले डॉक्टर पथक सज्ज ठेवावे, रोना कालावधीमध्ये आरोग्य यंत्रणेने तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा घेतल्या होत्या, या सेवा पूर्ववत सूरु ठेवण्याबाबतची सूचना केली. आमदार बागडे यांनी, पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्याबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली. अंबादास दानवे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी यापुढेही लग्न समारंभ, अंत्यविधी, बाजारपेठा येथील गर्दी नियंत्रणात ठेवून सभांना मर्यादित लोकसंख्येच्या उपस्थितीची परवानगी द्यावी अशी सूचना केली. आमदार बोरनारे यांनी गंगापूर व वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची उपलब्धता व लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याची मागणी केली.