Sambhajinagar Crime : तरुणीचे धर्मांतर करून मारहाण, अत्याचार ; ओळख लपवत चार लेकरांच्या बापाचा कारनामा

चार लेकरांचा बाप असलेल्या एका व्यक्तीने आपली खरी ओळख आणि वैवाहिक माहिती लपवत भिन्नधर्मीय २७ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मारहाण करीत अत्याचार केला.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crimesakal

छत्रपती संभाजीनगर : चार लेकरांचा बाप असलेल्या एका व्यक्तीने आपली खरी ओळख आणि वैवाहिक माहिती लपवत भिन्नधर्मीय २७ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मारहाण करीत अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तिचे धर्मांतर करून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने लग्नही केले. हा प्रकार मार्च २०२० ते एप्रिल २०२४ असे चार वर्षे घडत होता. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात ताहेर तय्यब पठाण याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

पीडित तरुणीने दिलेली तक्रार अशी ः तिची २०१९ मध्ये सेव्हन हिल परिसरातील एका दुकानामध्ये ताहेरशी ओळख झाली. त्यावेळी त्याने त्याचे नाव समीर पटेल, असे सांगून गुजराती समाजाचे असल्याचे भासवले. शिवाय स्वतः अविवाहित असल्याचे खोटे सांगितले. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मार्च २०२० मध्ये ताहेरने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर दोन वर्षे ते रिलेशनमध्ये होते.

या काळात तो समीर पटेल नसून ताहेर पठाण असल्याचे तिला कळाले. त्यानंतर तिने त्याला भेटणे टाळले. परंतु, त्याने तिला मारहाण करत आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले. त्यातून तरुणी दीड महिन्याची गर्भवती राहिली. त्याने गोळ्या देत तिचा गर्भपात घडवून आणला. शिवाय धर्मांतर करून बळजबरीने लग्न केले, असे तक्रारीत नमूद आहे. त्याआधारे पोलिसांनी ताहेरसह तय्यब शब्बीर पठाण, आयशा ताहेर पठाण आणि लैलाबी तय्यब पठाण (सर्व रा. उस्मान पार्क, देवळाई रस्ता, बीड बायपास) यांच्यावर गुन्हा नोंद केला. यातील आयशा ही ताहेरची पहिली पत्नी आहे. तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

Sambhajinagar Crime
Loksabha Election 2024 : महायुतीच्या सात उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्तात!

घरातच केले लग्न

ताहेरने एप्रिल २०२२ मध्ये पीडितेला मारहाण करत बळजबरी मांस खाऊ घातले. पाण्यात काहीतरी टाकून ते महिनाभर पिण्यास दिले. दरम्यान, धर्मगुरूंकडे नेत तिचे कपडे आणि केस जमा करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर पेहराव बदलण्याची सक्ती केली. धर्मग्रंथ वाचायला भाग पाडले. एक दिवस अज्ञातस्थळी नेत कोऱ्या बंधपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि घरातच हार घालत लग्न केले. ही सर्व कागदपत्रे व फोटो ताहेरकडे आहेत. या सगळ्यात इतर तिघांनी त्याला मदत केली, असा आरोपही पीडित तरुणीने केला. या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com