

बीड, : पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून करून मृतदेह घाटात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील अभिषेक नामदेव बरकंबे (वय २३) असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह आष्टी तालुक्यातील पिंप्री घाटात आढळला. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.