esakal | एटीएम फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांना पाहाताच चोरटे पसार

बोलून बातमी शोधा

null

एटीएम फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांना पाहाताच चोरटे पसार

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहरातील जलालपूर रस्त्यावर एचडीएफसी बँकेचे एटीएम यंत्र आहे. शनिवारी (ता.एक) मध्यरात्री चोरट्यांनी हे एटीएम फोडून रक्कम हडपण्याचा प्रयत्न संभाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न चांगलाच फसला. पोलिसांना पाहाताच यंत्र सोडून अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. शहरात विविध बँकेच्या एटीएम यंत्र आहेत. यातील अनेक एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नाहीत. या एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी जलालपूर रस्त्यावर असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम यंत्र शनिवारी मध्यरात्री फोडले.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

पैसे असलेले यंत्र उचलून घेऊन जात असताना संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार दिसला. पोलिसांचे वाहन पाहताच चोरट्यांनी यंत्र जाग्यावर सोडून धुम ठोकली. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन हे यंत्र ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहरात असलेल्या १४ ते १५ एटीएम यंत्राच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या एटीएम यंत्राची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता असताना बँकेने एटीएम मशीनची सुरक्षा कोणाच्या भरवशावर ठेवली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.