esakal | बीड: नद्यांना पूर जमिनी अन् पिकेही वाहून गेली
sakal

बोलून बातमी शोधा

beed

बीड: नद्यांना पूर जमिनी अन् पिकेही वाहून गेली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड : यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री झाला. जिल्ह्यात जोरदार झालेल्या पावसाने पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान केले. बीड, गेवराई व वडवणी तालुक्यात शंभर मिमीहून अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ७५.२ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसामुळे जमिनीसह सोयाबीन, कपाशी, कांदा आदी खरीप पिके वाहून गेली. नद्यांना पुर, ओढे तुडूंब आणि रस्त्यांवरील पूल वाहून गेल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या.

हेही वाचा: संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महिनाभराच्या उघडिपीनंतर मध्यंतरी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारी दुपार नंतरच पावसाला सुरुवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस झाला. सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ७५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड तालुक्यात सर्वाधिक १०७.६ मिमी, तर गेवराई १०२.४ व वडवणी १०२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली.

पावसामुळे जमिनीसह तुर, कपाशी, कांदा, सोयाबीन पीकेही वाहून गेली आहेत. कपाशीमध्ये गुडघाभर पाणी साचले. सिंदफणा, बिंदुसरा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहिल्या. माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून वाण, ऊर्ध्व कुंडलिका या मध्यम प्रकल्पांसह शिवणी, खटकळी, लोकरवाडी, वडगाव,भंडारवाडी, जुजगव्हाण, ईट, मन्यारवाडी, पांढरी, मनकर्निका, तिंतरणा आदी प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाले आहेत.

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार;पाहा व्हिडिओ

ऊर्ध्व कुंडलिकाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे नदीवरील पूल वाहून गेले आहेत. राजापूर (ता. गेवराई) गावाला पुराने वेढा दिला होता. उशिरापर्यंत गावाशी संपर्क तुटला होता. अंबाजोगाई तालुक्यात मासेमारी करायला गेलेल्या एकाचा वाहून जाऊन मृत्यू झाला. कपिलधार व सौताडा हे प्रमुख धबधबे ओसंडून कोसळत आहेत.

तीन तालुक्यांत मोठे नुकसान

बीड तालुक्यात सर्वाधिक १०७.६ मिमी, तर गेवराई १०२.४ व वडवणी १०२.४ या तीन तालुक्यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या तालुक्यांत जमिनीसह खरिपाची पिकेही वाहून गेली. शेतांमध्ये पावसामुळे गुडघाभर पाणी साचले. अनेक ठिकाणी पुलही वाहून गेले. बीड तालुक्यातील पिंपळनेर नाथारपूर रस्त्यावरील पूल वाहून गेला. तर, सिंदफणा, बिंदुसरा व खटकळी या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. गेवराई तालुक्यातील राजापूरला पाण्याने वेढा दिल्याने उशिरापर्यंत गावाचा संपर्क तुटला होता.

हेही वाचा: संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

धरणे तुडूंब

ऊर्ध्व कुंडलिका, कुंडलिका धरण ओव्हर फ्लो झाले आहे. ऊर्ध्व कुंडलिकाचे पाचही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला. यासह शिवणी, खळकळी, लोकरवाडी, वडगाव, भंडारवाडी, इट, जुजगव्हाण, मन्यारवाडी, मनकर्णिका, पांढरी, तिंतरवणा, वाण आदी प्रमुख धरणे तुडूंब भरले आहेत. कपिलधार, सौताडा धबधबे ओसंडून कोसळत आहेत. अनेक गावनद्या, ओढ्यांनाही पुर आला. पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

तालुकानिहाय पाऊस

- बीड : १०७.६ मिमी.

- पाटोदा : ८६.१ मिमी.

- आष्टी : ६९.६ मिमी.

- गेवराई : १०२.४ मिमी.

- माजलगाव : ३९.६ मिमी.

- अंबाजोगाई : ८८.५ मिमी.

- केज : ४३.६ मिमी.

- परळी : ३२.२ मिमी.

- धारूर ४३.९ मिमी.

- वडवणी : १०२.४ मिमी.

- शिरूरकासार : ७२.५ मिमी.

सरासरी : ७५.२ मिमी

loading image
go to top