esakal | कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह, मात्र काही लक्षण आढळल्याने उपचार घेत आहे : प्रीतम मुंडे

बोलून बातमी शोधा

pritam munde

जर आपल्याला लक्षणे दिसत असतील तर त्वरित डाॅक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन मुंडे यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह, मात्र काही लक्षण आढळल्याने उपचार घेत आहे : प्रीतम मुंडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड : बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी काही लक्षणे असल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ संदेशद्वारे माहिती दिली आहे.

केवळ आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे आपल्याला कोरोना नाही असं भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणे दिसत असतील तर त्वरित डाॅक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन मुंडे यांनी नागरिकांना केले आहे. कोणताही आजार अंगावर काढू नका. लवकर आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा, असे त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. आपल्या आशीर्वादाने लवकरच सेवेत रुजू होईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

ताई, योग्य उपचार व काळजी घ्या - धनंजय मुंडे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी डाॅ. प्रीतम मुंडे यांना योग्य उपचार व काळजी घ्या, असा सल्ला टिट्व करुन दिला आहे. टिट्व मध्ये मुंडे म्हणतात, की बीड जिल्ह्याच्या खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनात कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो.