esakal | वीज कोसळून लागली आग; शेतकरी बचावला, तर लाखोंचे नुकसान

बोलून बातमी शोधा

वीज कोसळून लागली आग; शेतकरी बचावला, लाखोंचे नुकसान
वीज कोसळून लागली आग; शेतकरी बचावला, लाखोंचे नुकसान
sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : तालुक्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यातच शनिवार (ता.एक) दुपारी झालेल्या अवकाळी पावसात चंदनसावरगाव शिवारातील वस्तीवर आकाशातून अचानक वीज कोसळली. यात शेतकरी बचावला. मात्र वीज कोसळून लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे सोयाबीन, हरभरा, गव्हू, कडब्याची गंज, पिकांना पाणी देण्यासाठी लागणारे पाईप व दुचाकीसह शेतातील संपूर्ण निवाराच आगीत जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या बंबने आग आटोक्यात आणल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचा धोका टळला आहे. तालुक्यातील चंदनसावरगाव शिवारातील येथील शेतकरी तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर शनिवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळली.

हेही वाचा: पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक

यात शेतातील घरात ठेलेले सोयाबीन, हरभरा, गव्हू, पिकांना पाणी देण्यासाठी लागणारे पाईप, दुचाकीस कडब्याची लावलेली गंजी जळून खाक झाली. या घटनेत शेतकरी सुदैवाने बचावला आहे. यावेळी लागलेल्या आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केल्याने आसपासच्या वस्तीलाच धोका निर्माण झाला होता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाल्याने आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतातील घराचे व साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले होते. मागील  पावसाळ्यात अंगावर वीज पडून एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.