

Chhatrapati Sambhjiajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: विभागात २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उसाचा गळीत हंगाम आता संपुष्टात आलाय. यंदाच्या गळीत हंगामात १ कोटी २५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज होता. तथापि, मार्चअखेर १ कोटी २१ लाख, ३४ हजार ४०६ टन उसाचे गाळप झाले. यात सर्वाधिक गाळप व साखरेचे उत्पादन बीड व छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यांतून झाल्याचे प्राप्त अहवालावरून समोर आले.