Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याचा मुक्तिलढा समजून घेताना...

विकासाच्या आकांक्षेने महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याची स्वप्ने पूर्ण झाल्याचे आजही पहावयास मिळत नाही.
Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangramsakal

- भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

हैदराबाद संस्थानातील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते. राजकीय पारतंत्र्य तर होतेच; पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते. ब्रिटिशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती. या अन्यायाविरुद्ध हिंदू महासभा, आर्य समाज व हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला.

अन्‌ मुक्तीची पहाट उगवली

या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, आ. कृ. वाघमारे, अनंत भालेराव, नारायणराव चव्हाण, स. कृ. वैशपायन, पुरुषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, देवीसिंह चौहान, शामराव बोधनकर, श्रीनिवासराव बोरीकर, मुकुंदराव पेडगावकर, राघवेंद्र दिवाण, फुलचंद गांधी, नागनाथ परांजपे, माणिकचंद पहाडे, श्रीधर वामन नाईक, व्यासाचार्य संदीकर इत्यादींनी मौलिक योगदान दिले.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : वेध उद्योगक्षेत्राच्या भविष्याचा

वेदप्रकाश, पं. श्यामलालजी, गोविंदराव पानसरे, शोएब उल्ला खान, श्रीधर वर्तक, कॉ. वसंत राक्षसभुवनकर, बहिर्जी शिंदे वापटीकर, जनार्दन मामा आदी अनेक जण हुतात्मा झाले. अखेर १३ सप्टेंबर १९४८ ला हैदराबादमध्ये पोलिस कारवाईला प्रारंभ झाला. या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे सांकेतिक नाव देण्यात आले. तिचे मुख्य संचालक लेफ्टनंट जनरल महाराज राजेंद्र सिंहजी हे होते.१७ सप्टेंबरला निजाम शरण आला. अशाप्रकारे १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थानात मुक्तीची पहाट उगवली.

विकासाच्या आकांक्षेने महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याची स्वप्ने पूर्ण झाल्याचे आजही पहावयास मिळत नाही. मोगल साम्राज्याचा दक्षिणेतील सुभेदार मीर कमरुद्दीन ऊर्फ निजाम उल्मुल्क याने इ. स. १७२४ ‘असफजाही’ राजवटीची स्थापना केली. मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, गहू, कापूस, डाळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : सामाजिक अभिसरण प्रक्रिया गतिमान व्हावी

पण, बहुतांश शेती ही कोरडवाहू होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादजवळ कागजीपुरा येथे हस्तव्यवसाय म्हणून कागद तयार होई. निजामाची सर्व फर्माने आणि राजपत्र या कागदावरच छापले जात. हैदराबाद संस्थानात उर्दू भाषेची सक्ती होती. चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत व पुढील शिक्षण उर्दू भाषेत दिले जाई. हैदराबाद संस्थानातील एकूण क्षेत्रफळाच्या ४२ टक्के भाग निरनिराळ्या जहागिरीने व्यापला होता.

सातवा निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर यास सत्ता आणि संपती याचे प्रचंड आकर्षण होते. १३ सप्टेंबर १९४८ ला हैदराबादमध्ये पोलिस कारवाईला प्रारंभ झाला. या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे सांकेतिक नाव देण्यात आले. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थानात मुक्तीची पहाट उगवली.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : मराठवाडा आणि बांधकाम व्यवसाय

हैदराबादच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण प्रवेश केला आहे. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचाच भाग होता. त्यामुळे मराठवाड्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपण एक बाब लक्षात घ्यावी लागेल की, केंद्रीय नेतृत्वाचा विरोध असतानाही हैदराबादचे त्रिविभाजन करून मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. विकासाच्या आकांक्षेने महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याची स्वप्ने पूर्ण झाल्याचे आजही पाहावयास मिळत नाही.

या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सवी वर्षात तरी आपण आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. मोगल सत्तेच्या उतरत्या काळात मोगलांशी दगाबाजी करून मोगल साम्राज्याचा दक्षिणेतील सुभेदार मीर कमरुद्दीन ऊर्फ निजाम उल्मुल्क याने इ. स. १७२४ ‘असफजाही’ राजवटीची स्थापना केली. ‘निजामुल्क’ हा यांना मिळालेला किताब.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याची पुण्याई...संत जनाबाई, बहिणाबाई अन् मुक्ताबाई...

‘निजाम’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘प्रदेशाची व्यवस्था पाहणारा’ असा होतो. स्वतंत्र राज्य घोषित करूनही असफजाही राजवटीतील सर्व राज्यकर्ते ‘निजाम’ या नावानेच ओळखले जात. विशेष म्हणजे निजामाच्या ताब्यातील या दक्षिणी सुभ्याचा कारभार १७६१ पर्यंत तत्कालीन औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगर येथूनच चालत असे. १७६२ ला निजामअली गादीवर आल्यानंतर मात्र हैदराबाद हीच असफजाही राज्याची राजधानी झाली.

निजामी राजवटीतील मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे मराठवाडा. मराठवाड्याचे क्षेत्रफळ २७५९१ चौ. मैल तर लोकसंख्या ५२,१९,५२८ इतकी होती. हैदराबाद संस्थानात उद्योगधंद्याचा फारसा विकास झाला नव्हता. संस्थानातील बहुतांश जनतेचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. उत्तम काळी मृदा असलेला आपल्या मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, गहू, कापूस, डाळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात. पण, बहुतांश शेती ही कोरडवाहू होती. पाणीपुरवठ्याच्या, सिंचनाच्या मोठ्या योजना तेलंगणा विशेषतः हैदराबादच्या आसपासच्या भागात निर्माण केल्या होत्या. त्या तुलनेत मराठवाड्यात सिंचन सुविधांचे प्रमाण अत्यल्प होते.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याचे नाव देशाच्या पटलावर नेणारे तीन सेनांनी

हैदराबाद संस्थान औद्यौगिकदृष्ट्यासुद्धा मागासलेले होते. कोळशाच्या काही खाणी, निजाम शुगर फॅक्टरी व अन्य एक साखर कारखाना, दोन कापड गिरण्या, ‘डेक्कन एअरवेज’ ही छोटीशी विमान कंपनी, वजीर सुलतान टोबॅको कंपनीचा चारमिनार सिगारेट बनवण्याचा कारखाना, ‘फारुखी दंतमंजन’, हर दर्द की दवा म्हणून ओळखला जाणारा ‘जिंदा तिलस्मात’ शिवाय बिदर येथील बिद्री कला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादजवळ कागजीपुरा येथे हस्तव्यवसाय म्हणून कागद तयार होई.

निजामाची सर्व फर्माने आणि राजपत्र या कागदावरच छापले जात. छत्रपती संभाजीनगरला हिमरू शाली आणि चादर, बीडला गुप्ती तयार केली जात असे. संस्थानात कमालीचे दारिद्र्य होते, शिक्षणाचा प्रसार नव्हता, समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा होत्या. चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत व पुढील शिक्षण उर्दू भाषेत दिले जाई. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी काही हायस्कूल व माध्यमिक शाळा (फोकानिया) होत्या. वरंगल, औरंगाबाद, गुलबर्गा येथे इंटर मीडिएटपर्यंत शिक्षण व हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठ होते.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : वेध उद्योगक्षेत्राच्या भविष्याचा

आरोग्य, रस्ते, उद्योगधंदे, दळणवळण व सार्वजनिक सुविधांचा अभाव होता. हैदराबाद संस्थानातील एकूण क्षेत्रफळाच्या ४२ टक्के भाग निरनिराळ्या जहागिरीने व्यापला होता. अत्यंत बुरसटलेली, कमालीच्या शोषणावर आधारलेली आणि पराकोटीच्या अन्यायांनी पुरेपूर भरलेली जमीनदारी व जहागिरदारी होती. त्यामुळे ब्रिटिश भारतातील प्रांतांची व मराठवाड्याची तुलना करणे अयोग्य आहे.

हैदराबादचा संस्थानिक सातवा निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर यास सत्ता आणि संपती याचे प्रचंड आकर्षण होते. ते अत्यंत महत्त्वाकांक्षी, जिद्दी, कमालीचे हट्टी होते, कुशाग्र बुद्धिमत्ता, हुशार, चतुर, मुत्सदी असे बहुढंगी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. उस्मान अली गादीवर आल्यापासून हैदराबादला स्वतंत्र देश बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होते. त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी मुस्लिम धर्माचा व मुस्लिम जातीयतेचा आधार घेतला.

१९२१ मध्ये एक आदेश काढून संस्थानात सभा संमेलने, बैठकी-प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली. व्यायामशाळा, आखाडे, खासगी शाळा, ग्रंथालये परवानगीशिवाय काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली. गस्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते. संस्थानात ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेच्या अंतर्गत स्थापन झालेल्या ‘रझाकार’ संघटनेने धुमाकूळ घातला.

कासीम रझवी याचे भडकावू नेतृत्व आणि सरकारचा पाठिंबा हे रझाकारांचे बळ होते. हैदराबाद संस्थानातील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते. राजकीय पारतंत्र्य तर होतेच; पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते. ब्रिटिशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती. या अन्यायाविरुद्ध हिंदू महासभा, आर्य समाज व हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला.

Marathwada Muktisangram
Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याची पुण्याई...संत जनाबाई, बहिणाबाई अन् मुक्ताबाई...

धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा (ता. लोहारा) येथे १९२१ मध्ये व्यंकटराव माधवराव देशमुख व अनंतराव गोविंदराव कुलकर्णी या दोन भावांनी एका राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेते, सरसेनानी आणि जनतेचे मुक्तिदाते स्वामी रामानंद तीर्थ व पूज्य बाबासाहेब परांजपे या छोट्याशा परंतु जाज्वल्य संस्थेमुळे हैदराबादच्या जनतेला मिळाले. भावी नेतृत्व इथेच, याच संस्थेत उदयाला आले आणि येथे एका छोट्या निवासी शाळेत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटले, त्यानेच पुढे विक्राळ स्वरूप धारण केले.

इ. स. १९३५ मध्ये स्वामीजी, बाबासाहेब परांजपे व त्यांचे सहकारी मोमिनाबाद (अंबाजोगाई) येथे आले. येथे त्यांनी योगेश्वरी शाळा पुनरुज्जीवित करून तिचे हायस्कूलमध्ये रूपांतर केले. १९३८ साली लातूरला सुरू असलेल्या महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशनात स्वामीजींनी आपल्या सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे पूर्ण येथे वेळ राजकारणात येण्याचा निर्णय जाहीर केला. १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. स्वामीजी मराठी, कन्नड, तेलगू बोलणाऱ्या तिन्ही भागांतील लोकांचे सर्वमान्य नेते झाले. स्वामीजींनी अत्यंत संयमाने या लढ्याचे नेतृत्व केले.

(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व वक्ते असून, बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com