

Sakal
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘दख्खन का ताज’ म्हणजे बीबी-का-मकबऱ्याची दुरवस्था होत आहे. सध्या केंद्रीय पुरातत्त्व विभागाचा जागतिक वारसा सप्ताह सुरू आहे. पण, वारसास्थळांबाबत केवळ आठवडाभर नव्हे; तर वर्षभर जागरूक असणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने पाच वर्षांपासून मकबऱ्याचे नुसते सौंदर्य काळवंडले नाही तर या देखण्या वारसास्थळाची जागोजागी पडझड होत आहे. मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूची अवस्था दयनीय आहे. इथे चितारलेल्या सुंदर कलाकृती काही ठिकाणी नामशेष झाल्या.