

Chh. Sambhajinager
sakal
बिडकीन (ता. पैठण) : येथील बसस्थानक परिसरात बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत सतरावर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीची ही घटना गुरुवारी (ता. २३) घडली. दरम्यान, यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.