

Bidkin Accident
sakal
(रविंद्र गायकवाड)
बिडकीन : दहेगाव–बिडकीन महामार्गावरील धामोरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुण व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२२) सायंकाळी अंदाजे सातच्या सुमारास घडली. श्रीहरी गोरखनाथ टेके (वय ३६, रा. बिडकीन) असे मृत तरुणाचे नाव आहे.