Chh. Sambhajinagar: मांजाने कापले नाक, डोळ्यांची नस; पडले तब्बल ४० टाके, बिडकीन येथे दुचाकीस्वार गंभीर
Nylon Manja: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सरस्वती भुवन विद्यालय परिसरात पतंगाच्या नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. घरी परतत असताना अचानक मांजा चेहऱ्यावर अडकल्याने डोळ्यांची नस आणि नाकाला कट बसला. त्यांना तब्बल ४० टाके पडले.
बिडकीन (ता. पैठण) : पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सरस्वती भुवन विद्यालय परिसरात पतंगाच्या नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. १४) सायंकाळी घडली.