Industrial Development
sakal
छत्रपती संभाजीनगर - ऑटोमोबाइल, औषधनिर्माण (फार्मा), कृषीवर आधारित आणि अन्नप्रक्रिया उद्योग मराठवाड्यात वाढीस लागावे, यासाठी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ठोस निधी उपलब्ध व्हावा. पायाभूत सुविधा, उत्पादन खर्च कमी करणे आणि सर्वसमावेशक औद्योगिक वाढ या तीन मुख्य क्षेत्रांवर भर देऊन मोठ्या घोषणा व्हाव्यात, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली.