Dharashiv News : सौर, पवन उर्जेसाठी देशातील बड्या कंपन्यांचे जिल्ह्यावर ‘लक्ष्य’

५४८ मेगावॅट होत आहे वीज निर्मिती
dharashiv
dharashivsakal

धाराशिव : सौर तसेच पवन उर्जा निर्मितीसाठी जिल्ह्यात मोठी संधी असल्याने देशातील बड्या कंपन्यांच्या नजरा लागल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५४८ मेगावॅट क्षमतेपर्यंत सौर, पवन उर्जा प्रकल्प जिल्ह्यात झाले आहेत. याशिवाय काही बड्या कंपन्या जिल्ह्यात येऊन नवीन प्रकल्प कार्यान्वीत करण्याच्या तयारीत आहेत.

वर्षातील ३६५ दिवसांपैकी तब्बल ३०० दिवस जिल्ह्यातील हवामान कोरडे असते. पावसाळा वगळता इतर वेळेत जिल्ह्यात स्वच्छ सुर्यप्रकाश पाहायला मिळतो. सौर उर्जेसाठी ही बाब पोषक आहे. याशिवाय जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कमी दराने जमीन उपलब्ध होत आहे. त्यामुळे सौर उर्जेसाठी जिल्ह्यात मोठा वाव असल्याने बड्या कंपन्या जिल्ह्याच्या मार्गावर आहेत.

dharashiv
Washi,Dharashiv News : एचआयव्ही बाधितांची शून्याकडे वाटचाल

कंपन्या जिल्ह्यात स्थिरावत आहेत

जिल्ह्यात सौर तसेच पवन उर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी असल्याने अनेक बड्या कंपन्या प्रकल्पात उतरत आहेत. यामध्ये बीव्हीजी ग्रीन एनर्जी, एमएस पाॅवर जनरेशन कंपनी, टीएस वींड, एनरीच एनर्जी अशा सौर उर्जा निर्मितीच्या कंपन्यांनी जिल्ह्यात एक मेगावॅट ते ६० मेगावॅट पर्यंतचे प्रकल्प कार्यान्वीत केले आहेत. दरम्यान पवन उर्जा निर्मितीत रिन्यू वायू उर्जा प्रायव्हेट लिमिटेड, टोरॅंट सोलारजेन लिमीटेड, टाटा कंपनीची टीपी सौर प्रा. लिमीटेड आदी कंपन्या जिल्ह्यात पवन उर्जा निर्मिती करीत आहेत. या कंपन्यांचे २५ मेगावॅटपासून ९७ मेगावॅटपर्यंतचे प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. जिल्ह्यात सौर उर्जेच्या माध्यमातून २७३ मेगावॅट तर पवन उर्जेच्या माध्यामातून २७५ मेगावॅट उर्जानिर्मिती होत आहे. या दोन्हीच्या माध्यमातून ५४८ मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता जिल्ह्यात तयार झाली आहे.

बालाघाट डोंगररांगांचा फायदा

जिल्ह्याचा विस्तार बालाघाट डोंगररांगावर दक्षिण-उत्तर असा झाला आहे. समुद्रसपाटीपासून ठराविक उंचीवर जिल्ह्याचा भूभाग असल्याने मोठ्या प्रमाणात पवन उर्जा निर्मिती होत आहे. त्यासाठी सध्या जिल्ह्यात अनेक कंपन्यांनी जाळे तयार करायला सुरुवात केली आहे. केवळ चारच कंपन्यांच्या माध्यमातून २७५ मेगवॅट वीज तयार होत आहे.

जिल्ह्यात पवनचक्क्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे पवन उर्जानिर्मिती होत आहे. शिवाय सौर उर्जेसाठीही जमीन उपलब्ध होत आहे. त्यामुळे या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती होत आहे.

- मकरंद आवळेकर, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, धाराशिव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com