
औरंगाबाद - दोन जुळ्या मुलांचे वाढदिवस कसा साजरा करायचा हा मनात विचार सुरु होता.. पण कोरोनाचं संकट पाहून दाम्पत्यानं आपल्या पिलांचा वाढदिवशी गरजू होतकरूंना शंभर सॅनेटाईझर, मास्क वाटले.
लोकांत कोरोनाबाबत जागृती केली अन.. मुलांनाही मास्क घालीत त्यांचा वाढदिवस घरातच छोट्या पद्धतीनं साजरा केला.
संतोष आणि अश्विनी ढवळे (रा. करमाड, मूळ. पारडगांव ता.घनसावंगी जि. जालना ) या दाम्पत्यानं हा पुढाकार घेतला.
मेट्रो शहरं कोरोनाच्या खाईत आहेत. अशा स्थितीत कोरोना (कोवीड -19) विषाणूबाबत जागृतीही होत आहे. पण कोरोनाच्या संसर्गाचे बारकावे तालुका, खेड्यात माहितीच आहेत असं नाही. अशा भागात सॅनेटायझर आणि मास्क मिळणे फारसे शक्य होत नाही.
हिच बाब लक्षात घेत करमाड येथील मेडिकल व्यावसायिक संतोष ढवळे यांनी त्यांच्या गुरु आणि प्रसाद या जुळ्या मुलांचा 20 एप्रिल रोजी दुसरा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी गावातील होतकरू आणि गरजवंतांना सॅनेटायझर व मास्कचे वाटप केले.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
सॅनेटायझर कसे वापरावे, हात कोणत्या पद्धतीने धुवावे, मास्क कसा लावावा, तोंड, नाक व डोळ्यात विषाणूचा संसर्ग होऊ नये याबाबत लोकांना जागृत केले. स्वछतेचे महत्व सांगून आरोग्याबाबत लोकांना जागृत केले. विशेषतः त्यांच्या जुळ्या मुलांनीही स्वतः मास्क घालून सॅनेटायझर आणि हँडवॉशचे वाटप केले. ही बाब म्हणजे आरोग्याबाबत बालकांनाही एक दृष्टिकोन देणारी ठरते.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.