महापालिका निवडणुकीपूर्वी पडणार भाजपला खिंडार.... 

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांनी शुक्रवारी (ता.14) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे बारवाल यांच्या गटात असलेले भाजप नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, भाजपला खिंडार पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या एप्रिल 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी महापौर गजानन बारवाल यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या श्री. बारवाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व ते जिंकूनही आले.

त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी बारवाल यांना शिवसेनेत परत घेण्यासाठी प्रयत्न केले; मात्र बारवाल यांनी अपक्ष नगरसेवकांना एकत्र घेत महापालिकेत शहर विकास आघाडी स्थापन केली व भाजप गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका वर्षासाठी स्थायी समिती सभापतिपदसुद्धा मिळविले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असतानाच आज बारवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांची उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बारवाल यांनी घेतलेली ही भेट राजकीय असल्याचीच चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

भाजपमध्ये तनवाणी गट अस्वस्थ 

शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना शहराध्यक्षपद देण्यात आले होते. त्यामुळे तनवाणी सोबत गेलेल्या शिवसेनेतील नगरसेवकांना मोठे पाठबळ मिळाले; पण तनवाणी यांच्या शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या गटातील 10 ते 12 नगरसेवक अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. हे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे.

BJP Leader Gajanan Barwal Meets Uddhav Thackeray Shivsena Aurangabad News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com