esakal | तिच्या लग्नाच्या तगाद्यामुळे विवाहित पोलिसानं पिलं विष
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

विष्णू यांनी लग्नाला विरोध केल्याने मुलीसह ठार मारण्याची धमकी दिली. या सततच्या तगाद्याला कंटाळून विष्णू यांनी गुरुवारी रात्री विष प्राशन केले. ही बाब कळताच त्यांना तत्काळ जालन्याच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी तपासून मयत जाहीर केले. 

तिच्या लग्नाच्या तगाद्यामुळे विवाहित पोलिसानं पिलं विष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जाफराबाद : प्रेमाच्या संबंधांतून सतत लग्न करण्याचा आणि दागिने देण्याचा तगादा लावल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याने गुरुवारी (ता.13) रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी राजूर पोलिस चौकीतील महिला पोलिस कर्मचारी, तसेच अन्य पोलिसावर जाफराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुलडाणा पोलिस मुख्यालयाअंतर्गत कार्यरत विष्णू रामराव गाडेकर (वय 35, ह.मु.देऊळगावराजा, मुळ रा.सवासणी, ता.जाफराबाद) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत विष्णू यांच्या पत्नी अनिता पोलिसांत फिर्याद दिली. 

अशोक चव्हाण म्हणाले, मेरे सपनें की रानी

त्यानुसार विष्णू गाडेकर यांची राजूर पोलिस चौकीत कार्यरत एका महिला कर्मचारीसोबत गेल्या काही वर्षांपासून ओळख होती. या ओळखीतून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातच या महिला कर्मचाऱ्याने विष्णू यांच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला, तसेच दागिने करण्याची मागणी केली. संशयित महिला कर्मचाऱ्यासोबतच संशयित प्रशांत उबाळे यानेही तिला साथ दिली. 

विष्णू यांनी लग्नाला विरोध केल्याने मुलीसह ठार मारण्याची धमकी दिली. या सततच्या तगाद्याला कंटाळून विष्णू यांनी गुरुवारी रात्री विष प्राशन केले. ही बाब कळताच त्यांना तत्काळ जालन्याच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी तपासून मयत जाहीर केले. 

अंत्यसंस्काराहून परततानाच काळाचा घाला

या प्रकरणी अनिता विष्णु गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन संशयित महिला पोलीस कर्मचारी आणि प्रशांत ऊबाळे यांच्याविरुध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे अंमलदार किशोर मोरे यांनी गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे हे करीत आहे. 

loading image
go to top