'शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपकडून खोटा आरोप'

औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे
औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे
Updated on

औरंगाबाद : शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपकडून खोटा आरोप केला जात आहे. शिवसैनिक नक्कीच मारहाण करू शकतो, मात्र तसे काही कारण नव्हते. परंतू जर कोणी अंगावर आले तर शिवसेना (Shiv Sena) सोडणार नाही, हे देखील तितकेच खरे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) दिली. शिवसैनिकांनी मारहाण केल्याची भाजपकडून तक्रार करण्यात आली. याविषयी आमदार श्री.दानवे म्हणाले, की भाजपकडून (BJP) युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप होत आहेत, पोलिसांवरदेखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) लसीकरण केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता सकाळी जाऊन टोकन घ्यायचा. नंतर येणाऱ्यांना ही लस भाजपकडून दिली जात असल्याचे खोटे सांगून लसीकरणाचे राजकारण करत होते.(bjp make fake allegation against shiv sena, ambadas danve said glp88)

औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे
लसीकरण केंद्रावर भाजप-शिवसेनेचा राडा, पदाधिकाऱ्याला मारहाण

ही बाब एका नागरिकाला खटकली, त्यांनी ही बाब शिवसैनिकाला कळवली. शिवसैनिकांनी तिथे जाऊन जाब विचारला. त्यानंतर त्यावेळी केंद्रे नावाच्या कार्यकर्त्याला चक्कर आली असावी. भाजप असे आरोप करत असेल तर अतिशय चुकीचे आहे. शिवसैनिकांना अशा साध्यासुध्या लोकांना मारहाण करण्याची गरज नाही, मात्र शिवसेनेच्या अंगावर कोणी आले तर शिवसेना सोडणार नाही हेदेखील तेवढेच खरे आहे असे स्पष्ट केले.

औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे
औरंगाबादला दिलासा! हजार जणांच्या कोरोना चाचणीत सर्वच निगेटीव्ह

युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले, की विजयनगर लसीकरण केंद्रावर अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. याची कार्यकर्ते आज अधिकाऱ्यांकडून शहानिशा करत असताना तिथे भाजपच्या माजी नगरसेविकेचे पती गोविंद केंद्रे आले. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घातली. आपण पकडले गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चक्कर आल्याचे नाटक केले. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांनी मला नेऊन मारहाण केली. १० हजार रूपये काढून घेतले, अशी खोटी तक्रार केली. ही आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी कुठेही लढायची आमची तयारी आहे. आम्ही सर्वसामान्यांना न्याय देणार. शासनाची लस आहे ती सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे, श्री.जंजाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com