भाजप शिवसेना
भाजप शिवसेना

लसीकरण केंद्रावर भाजप-शिवसेनेचा राडा, पदाधिकाऱ्याला मारहाण

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ओबीसी सेलचे शहराध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे यांना शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत भाजपतर्फे सोमवारी (ता.२६) जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर (Aurangabad) निदर्शने करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात आली. गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) भाजपचे गोविंद केंद्रे आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जंजाळ यांनी केंद्रे यांना कॅबिनेटमंत्री भुमरे यांच्या कार्यालयात नेत मारहाण केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. केंद्रे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात यावे या मागणीसाठी ओबीसी प्रदेशचे नेते भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वाखाली जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात आले.(bjp shiv sena office bearers fights in aurangabad glp88)

भाजप शिवसेना
औरंगाबादला दिलासा! हजार जणांच्या कोरोना चाचणीत सर्वच निगेटीव्ह

यात गोविंद्र केंद्रे यांचे अपहरण करीत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शिवसेनेच्या नेत्यांतर्फे दादागिरी करण्यात येत असल्याचे आरोप करीत जंजाळ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात माजी महापौर भगवान घडमोडे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, बबन नरवडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अमृता पालोदकर, ओबीसी महिला मोर्च्यांच्या शालिनी बुंधे, समीर राजूरकर, मनिषा भन्साळी यांच्यासह भाजपचे शहर कार्यकारिणी सह सर्व आघाडी, मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी धीरज केंद्रे यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

भाजप शिवसेना
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर भ्याड हल्ला केला. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कार्यालयात नेऊन बेसावधपणे मारणे, हमला करणे, गंभीर दुखापत करणे असा जो प्रकार शिवसेनेने केला या प्रकराचा निषेध करतो. भाजपचे कार्यकर्ते दोन महिन्यापासून लसीकरण केंद्र काढून जनतेच्या तत्पर सेवेत काम करीत आहेत. याला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बघवल्या गेले नाही. तथापि, यामुळे भाजपेच काम थांबणार नाही.

- संजय केणेकर, शहराध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com