

Chhatrapati Sambhajinagar
esakal
नवी दिल्ली: जागावाटपाचा तिढा सुटल्याने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी घोषित करण्यात आली. पक्षाने अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली असून खा. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांचे होणारे सासरे अरूण लखानी यांना वर्धा - चंद्रपूर- गडचिरोली मतदारसंघातून तिकीट दिले आहे. भाजपने अमरावतीमधून प्रवीण पोटे, भंडारा- गोंदिया मतदार संघातून अविनाश ब्राम्हणकर, सोलापूर येथून राजेंद्र राऊत, सांगली-सातारा मतदार संघातून धैर्यशील कदम, संभाजीनगर- जालना येथून सुहास शिरसाट, नांदेड मधून अमर राजूरकर, धाराशिव बीड लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन तर नागपूरमधून राजीव पोतदार यांना तिकीट दिले आहे.