esakal | सरकारने कोरोनाची भीती दाखवात जनतेला फसवले - संजय केणेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Bjp News

श्री. केणेकर म्हणाले की, सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. सरकारने कोरोनाची भीती दाखवत प्रत्येकाची फसवणूक केली आहेत. यात शेतकऱ्यांना ही भीती दाखवत बांधावर देण्यात येणारे खतही थांबवले आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही यामुळे थकले

सरकारने कोरोनाची भीती दाखवात जनतेला फसवले - संजय केणेकर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : भाजपतर्फे शहरात गल्लोगल्ली श्रीरामाच्या पूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु शिवसैनिकांच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली पोलीस पाठवून आमच्यावर गुन्हे दाखल केले. सरकार कोरोनाची भीती दाखवत जनतेला प्रत्येक विषयात फसवल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी शुक्रवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत केला. 

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात गजानन महाराज मंदिर गुलमंडी व विविध भागात पूजन व आरती करण्यात आली. कोरोनाच्या काळात एकत्र येऊन पूजा करण्यात मनाई असताना भाजपतर्फे पूजन व आरती करण्यात आली. 

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

श्री. केणेकर म्हणाले की, सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. सरकारने कोरोनाची भीती दाखवत प्रत्येकाची फसवणूक केली आहेत. यात शेतकऱ्यांना ही भीती दाखवत बांधावर देण्यात येणारे खतही थांबवले आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही यामुळे थकले. हीच भीती दाखवत विकास कामेही थांबवली असल्याचा आरोपही केणेकर यांनी केला आहे.

हेही वाचा- रशियातील मोठ्या उद्योगाला ‘ऑरिक’मध्ये ४३ एकर जागा   

हे शिवशाहीचे सरकार आहे की निझामाचे ः आमदार सावे 
शिवसेनेच्या राज्यात रामाच्या पूजनाला बंधन टाकण्यात आले आहेत. हे शिवशाहीचे सरकार आहे की निझामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज प्रत्येकाच्या मुखी रामाचे नाव आहे प्रत्येकजण एकमेकाला राम राम करत असतो. हेच रमाचे नाव घेणाऱ्यावर बंधने घातली आहेत. सगळ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या राज्य सरकारचा मी निषेध करतो. असेही आमदार सावे  म्हणाले. यावेळी शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, कचरू घोडके, राम बुंधवत,राजेंद्र साबळे उपस्थित होते. 

loading image
go to top