

Sambhajinagar BJP Workers Turn Aggressive
Esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे. महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यानं नाराजीनाट्याला वेगळं वळण लागलं आहे. भाजपकडून यावेळी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे ज्यांना तिकीट नाकारलं गेलं ते कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयासमोर उमेदवारी नाकारलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आक्रमक झालेल्या नाराज कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला नेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.