
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचे आदेश काढून तीन वॉर्डांच्या प्रभागासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची (शिंदेसेना) भाजपने कोंडी केली आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा भाजपचे नेते वारंवार करत आहेत. मंगळवारी काढण्यात आलेले आदेश म्हणजे त्यादृष्टीने पक्षाने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, चार प्रभागांच्या रचनेमुळे अपक्षांसह छोट्या पक्षांनादेखील मोठा फटका बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी ही पहिल्यांदाच प्रभागनिहाय निवडणूक होत आहे.