esakal | रक्तगटानुसार WhatsApp Group तयार, नातेवाईकांची धावपळ झाली कमी
sakal

बोलून बातमी शोधा

blood collection

रक्तगटानुसार WhatsApp Group तयार, नातेवाईकांची धावपळ झाली कमी

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: एखादा रुग्ण रूग्णालयात असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ सुरू होते. ही धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा माहेश्वरी युवा संघटनने पुढाकार घेतला आहे. रक्तदाता शोधणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा माहेश्वरी युवा संघटनने जिल्हय़ातील सर्व रक्तदात्यांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येक रक्त गटानुसार व्हॉटसअॅप ग्रूप बनवले आहे. रक्तासोबतच प्लाझ्माचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न युवा संघटनेकडून केला जात आहे.

जिल्हा माहेश्वरी युवा संघटन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. युवा संघटनकडे युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. याचा फायदा व्हावा म्हणून संघटनतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यतील कोणताही व्यक्ती सामील होऊ शकतो. ज्या रक्तदात्याचा जो रक्तगट आहे त्यानुसार तो रक्तदाता त्या ग्रूपमध्ये लिंकद्वारे सामील होतो. ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे तो व्यक्ती या ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधतो व ताबडतोब संबंधित पदाधिकारी त्या व्हॉटसॲप ग्रूपमध्ये सविस्तर माहिती टाकून रक्तदाता मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा: औरंगाबादेत दिवसभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण, साडेअकरा हजार जणांनी घेतली लस

जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ग्रूपमध्ये सामील व्हावे, असे आवाहन जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष बजरंग नावंदर, सचिव वैभव मंडोरा, कोषाध्यक्ष सीए रामकुमार राठी, या योजनेचे प्रकल्पप्रमुख अ‍ॅड. अक्षय बाहेती, विक्रम बजाज, सचिन तोतला, धिरज राठी यांनी केले आहे. ज्या रक्तदात्यांना या ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल त्यांनी या योजनेचे प्रकल्प प्रमुख अ‍ॅड. अक्षय बाहेती यांना ९५२३३४४४४४ किंवा विक्रम बजाज यांना ९७६३००१२३४ या क्रमांकावर फक्त मेसेज करावा, त्या रक्तदात्याला त्या संबंधित ग्रुप मध्ये सामील करून घेण्यात येईल अशी माहिती संघटनतर्फे देण्यात आली.

loading image