esakal | पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

drown

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बनोटी : अतिवृष्टीमुळे शेतात झालेले नुकसान पाहून घराकडे परतताना मनुदेवी नदी पात्रात मंगळवारी (ता.३१) वाहून गेलेल्या बोरमाळ तांडा (ता.सोयगाव) येथील ५० वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (ता०१) दुसऱ्या दिवशी ५ कि.मी. अंतरावरील वरठाण (ता सोयगाव) फरशी पुलाजवळ मृतदेह आढळून आला. अमरसिंग भावसिंग चव्हाण (वय ५०)असे मृत इसमाचे नाव आहे. बनोटी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्याने नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहे. (Aurangabad News)

बोरमाळ तांडा येथील चव्हाण हे तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतात गेलेले नसल्याने मंगळवारी भरपावसात पीक परिस्थिती पहाण्यासाठी गेले होते. पीक पाहून ते मनुदेवी नदी किनारी असलेल्या रस्त्याने घराकडे जात असताना नदीत वाहून गेले. कुटुंबियांनी तसेच नातेवाइकांनी नदी किनारी शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा कुटुंबीयांनी शोध सुरु केला असता वरठाण येथील पुलाजवळील पाण्यात मृतदेह आढळून आला.

हेही वाचा: दौलताबाद किल्ल्याच्या आवारात स्थानिकांचे अतिक्रमण

बोरमाळ तांडा ते वरठाण फरशी पूल हे जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असल्याने पाण्याचा प्रवाह किती जोरात होता याचा अंदाज येतो बनोटी दुरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर गीते, जमादार कौतिक सपकाळ, श्रींकात पाटील, विकास दुबीले, राजेंद्र बरडे हे करीत आहेत.

loading image
go to top