kalpana bhagwat
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहरातील एका बड्या हॉटेलातून ताब्यात घेतलेल्या कल्पना भागवत या महिलेचे पाकिस्तानपर्यंतचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले. आता तिच्या मोबाइलमध्ये चक्क पेशावर छावणीतील (कॅन्टोन्मेंट बोर्ड) काही महत्त्वाच्या व्यक्तींचे मोबाइल नंबर आढळले आहेत. अफगाण दूतावासासह एकूण ११ आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरही सापडले आहेत. यामुळे आयबी, एटीएससह सर्वच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.