Bomb Found In Aurangabad
Bomb Found In Aurangabad esakal

Aurangabad| कन्नडमध्ये आढळला बॉम्ब, बॉम्बशोधक पथकाने केला निष्प्रभ

...त्यामुळे शहरात खळबळ ऊडाली. औरंगाबाद येथून बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड शहरातील कन्नड-चाळीसगाव रस्त्यावरील विश्वकर्मा फर्निचर दुकानासमोर गुरुवारी (ता.नऊ) सकाळी नऊ वाजता बॉम्ब आढळून आला. त्यामुळे शहरात खळबळ ऊडाली. औरंगाबाद (Aurangabad) येथून बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर सिंचननगरी परिसरातील आवारात बॉम्ब निष्प्रभ करण्यात आला. कन्नड (Kannad) - चाळीसगाव रस्त्यावर किरण रमेश राजगुरू यांचे विश्वकर्मा फर्निचर दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या समोरच असलेल्या लाकडी बाकड्यावर एक मोबाईलचा बंद बॉक्स आढळून आला. (Bomb Found, Bomb Search Team Defuse It In Kannad Of Aurangabad)

Bomb Found In Aurangabad
पंकजांना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचे टोकाचे पाऊल, आत्महत्येचा केला प्रयत्न

कोणाचा तरी मोबाईल चुकुन राहीला असावा म्हणून त्यांनी बॉक्सची चिकटपट्टी काढून पाहिली असता त्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी आपले बंधू किशोर राजगुरू यांना माहिती दिली. त्यांनी त्याचे मोबाईलवर आलेले फोटो बघून या वस्तूला हात लाऊ नका, अशी सूचना दिली व माहिती पोलिस निरीक्षक राजीव तळेकर, संग्राम भालेराव यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब पोलीस बंदोबस्त करून आजूबाजूची दुकाने खाली केली. तसेच बॅरिकेट्स लावून चाळीसगाव व औरंगाबाद जाणारी प्रवासी वाहतूक बंद केली. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांना माहिती दिली. त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकासह घटनास्थळी भेट दिली. बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश घीर्डीकर, रोहित जाधव, धरमसिंग देडवाल, मंगलसिंग जारवाल, सुनील दांडगे, राम गोरे, बॉम्बशोधक श्वान प्रिन्स यांनी परिसर ताब्यात घेऊन बॉम्बची तपासणी केली. सदरील बॉम्ब सिंचननगरी या भागातील नागरिकांना बाहेर काढून निष्प्रभ केला. यावेळी स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला.

Bomb Found In Aurangabad
मलिक व देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना... : अमोल मिटकरी

बॉम्बचे अवशेष तपासणार

या बॉम्बचे अवशेष जमा करून प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com