पंकजांना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

भाजपने पंकजा मुंडे यांना संधी न दिल्याने त्यांचे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde Newsesakal

अहमदनगर : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. उद्या शुक्रवारी (ता.दहा) राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापले उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी न दिल्याने त्यांचे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे. (Pankaja Munde Supporter Attempted End Himself In Ahmednagar)

Pankaja Munde News
मलिक व देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना... : अमोल मिटकरी

अहमदनगर (Ahmednagar) येथे मुंडे यांच्या समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुकुंद गर्जे असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गर्जे यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. (Legislative Council Election)

Pankaja Munde News
मला झालेली अटक बेकायदा! नुकसान भरपाई मिळावी, केतकी चितळेची मागणी

औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यालयावर पंकजा मुंडे समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे. सदरील कृत्य विरोधकांचे असून हल्लेखोर भाजपचे किंवा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नव्हते, अशी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com