औरंगाबाद बूस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

booster dose

औरंगाबाद : बूस्टर डोससाठी आता मोजावे लागणार पैसे

औरंगाबाद :कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी एकीकडे प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे आता १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेने ठरवून दिलेल्या खासगी रुग्णालयातून नागरिकांना लस घ्यावी लागणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ व फ्रंटलाइन वर्कर्स यांनाच महापालिकेतर्फे मोफत बूस्टर डोस मिळणार आहे.

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची सूचना शासनस्तरावरून केली जात आहे. त्यानुसार प्रशासनातर्फे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी पहिल्या डोसची टक्केवारी ८४ तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ६४ टक्के आहे.

दरम्यान बूस्टर डोसही सुरू करण्यात आला. मात्र पहिल्या व दुसऱ्या डोसला प्रतिसाद न देणाऱ्या याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, फ्रंटलाइन वर्कर्स व ६० वर्षांवरील नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून मोफत बूस्टर डोस दिला जाईल. उर्वरित १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयात पैसे भरून बूस्टर डोस घ्यावा लागेल. ३०० रुपये भरून बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे.

या रुग्णालयांत आहे सुविधा

बूस्टर डोसची सुविधा बजाज हॉस्पिटल, धूत हॉस्पिटल व मेडीकव्हर या तीन खासगी रुग्णालयात आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात एकही रुग्णालय नाही. कमलनयन बजाज हॉस्पिटल बीड बायपास रोडवर आहे. धूत हॉस्पिटल मुकुंदवाडीच्या पुढे आहे. तर चिश्तिया चौकात मेडीकव्हर हॉस्पिटल आहे. त्यामुळे नागरिकांना डोस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार आहेत.

Web Title: Booster Dose Money Senior Citizen Frontline Worker Free Vacccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..