
देशभरात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा रविवारी पार पडली. छत्रपती संभाजीनगरात १९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, एका परीक्षा केंद्रावर प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची चर्चा होत आहे. प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरण समजल्यानं तिचा मोबाईल काढून घेण्यात आला. यामुळे दोघांमध्ये तीन महिन्यांपासून बोलणं नाही आणि भेटही झालेली नाही. शेवटी ती परीक्षेसाठी येणार असल्याचं समजताच प्रियकराने दोन मित्रांना सोबत घेऊन परीक्षा केंद्र गाठलं. पेपर संपताच परीक्षा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकरासह दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर सगळी प्रेमकहाणी तरूणानं पोलिसांना सांगितली.