Sambhaji Nagar : नियम तोडाल तर दंडाची पावती घरी ;संभाजीनगर शहरात चौकाचौकांमध्ये अत्याधुनिक कॅमेरे

शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. सिग्नलवर स्टॉप लाईन ओलांडणे, सिग्नल तोडून जाणे, विना हेल्मेट किंवा ट्रिपल सीट प्रवास करणे असे प्रकार सुरू आहेत, पण आता वाहतूक नियमांचा भंग कराल तर तुम्हाला घरपोच दंडाची पावती येऊ शकते.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. सिग्नलवर स्टॉप लाईन ओलांडणे, सिग्नल तोडून जाणे, विना हेल्मेट किंवा ट्रिपल सीट प्रवास करणे असे प्रकार सुरू आहेत, पण आता वाहतूक नियमांचा भंग कराल तर तुम्हाला घरपोच दंडाची पावती येऊ शकते. स्मार्ट सिटीने शहरातील चौका-चौकात अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे २६ जानेवारीपासून कार्यान्वित केले जाणार आहेत.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये सुमारे ७०० सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वापर पोलिसांतर्फे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी होत आहे. त्यासोबतच आता महत्त्वाच्या १७ जंक्शनवर १२२ एएनपीआर (अॅटोमेटिक नंबर प्लेट रिकग्नीशन) कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हे कॅमेरे २६ जानेवारीपासून पोलिस आयुक्तालयांतर्गत ई-चालन प्रणालीशी संलग्न केले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास या कॅमेऱ्यांव्दारे अॅटोमेटिक फोटो काढले जातील. त्यानंतर दंडाची पावती वाहनधारकास त्याच्या मोबाईल क्रमांकावर संदेशाव्दारे काही मिनिटात दिली जाईल. सिग्नल तोडणे, स्टॉप लाइनचे उल्लंघन, राँग साइड, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट वाहन चालवणे आदींसाठी हा दंड केला जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : रसिकांनी अनुभवला ‘कथ्थक’चा आविष्कार ; वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या ‘पूर्वरंग’चे थाटात उद्‍घाटन

वाहतुकीला लागणार शिस्त

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या वाहतूक पोलिस चौका-चौकात उभे राहून कारवाई करतात, पण आता एएनपीआर कॅमेऱ्याव्दारे ई-चालान देवून दंडाची पावती मोबाईलवर पाठविली जाणार आहे. वाहनधारकांना शिस्त लागावी हा, यामागचा उद्देश आहे, असे वाहतूक शाखेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांव्दारे शहरातील कोणत्या भागात वाहतूक कोंडी झाली आहे हे पाहून वाहतूक नियंत्रणाचे काम तत्काळ करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com