
घरगुती अडचणींमुळे नववीत शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापिकेनं लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय. दहावीच्या वर्गात प्रवेश हवा असेल तर दहा हजार रुपये दे अशी मागणी मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्याकडे केली. या विद्यार्थ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लातुरमधील एका शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकेला लाच देताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.