

Lost for Decades, Found Again: Brothers Reunite at Sakal Book Festival
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवातील दालन क्रमांक दोन येथे एक वाचक आले. ‘तुमची सगळी बेस्ट सेलर पुस्तके पॅक करून द्या’, असे ते प्रकाशकाला म्हणाले. त्यामुळे प्रकाशकाने आपली बेस्ट सेलर पुस्तके जमा करून एका पिशवीत भरली आणि पुस्तकांचे बिल तयार केले. ‘या बिलावर नाव काय लिहू’, असे प्रकाशकाने समोरील ग्राहकाला विचारले. ग्राहकाने आपले नाव सांगितले. हे नाव ऐकताच प्रकाशकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. कारण हे दोघे तब्बल ३५ वर्षांनी एकमेकांना भेटत होते. त्यांच्यातील नाते केवळ प्रकाशक-ग्राहकाचे नव्हे; तर भावाभावाचे होते.