बांधकाम परवानगी आणखी ३ महिने ऑफलाइनच; महापालिकेला द्यावे लागणार हमीपत्र

हमीपत्र देणाऱ्या महापालिकांना ३० जूनपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी देता येईल
Building permit offline for another three months Aurangabad corporation
Building permit offline for another three months Aurangabad corporationsakal

औरंगाबाद : शहरातील मालमत्ताधारकांना आणखी तीन महिने ऑफलाइन बांधकाम परवानगी मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेला मात्र शासनाला हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्र देणाऱ्या महापालिकांना ३० जूनपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी देता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम परवानगी घेतना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार एक ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी सुरू करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया राबवताना देखील अडचणी कमी झालेल्या नाहीत. म्हणून काही काळ ऑफलाईन व ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे बांधकाम परवानगी दिली जात होती.

दरम्यान ऑफलाईन परवानगीसाठी शासनाने मार्चअखेरपर्यंतच मुदत दिली होती. असे असले तरी राज्यातील काही महापालिकांमध्ये अद्याप ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी तीन महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे हमीपत्र सादर करावे, हमीपत्र देणाऱ्या महापालिकांना तीन महिन्यांसाठी ऑफलाईन बांधकाम परवानगी देण्याची मुभा राहील, असे नगर विकास विभागाचे अव्वर सचिव किशोर गोखले यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com