
धावत्या कारने घेतला पेट; पाच जण होरपळले
पाचोड (औरंगाबाद): बीडकडून औरंगाबादकडे भरधाव वेगात जाणारी ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली आहे. तर त्यातील पाच जण होरपळले असून दोघेजण गंभीर आहेत. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. तीन) भोकरवाडी फाटयाजवळील टोलनाक्याजवळ घडली.
यासंबंधी अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. ३) पल्लवी वसंत सुरवसे (वय २०) चालक - गोविंद वसंत सुरवसे (वय २९ ) प्रथमेश बालाजी शिरसाठ, मीराबाई बालाजी शिरसाठ व प्रतिक बालाजी शिरसाठ हे सर्व (रा.औरंगाबाद) आपल्या ओमनी कारने (क्रमांक - एम.एच २० बी.वाय.३७५३) बीडहून औरंगाबादला जात असताना अचानक ही कार पाचोडपासून पाच किलोमीटर अंतरावर जाताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ही कार दुभाजकाला धडकली व तिने कोलंट्या उड्या घेत ती रस्त्यावर उलटली.
हेही वाचा: लातुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७७३ जणांवर गुन्हे दाखल
त्यात काही समजण्यापूर्वीच कारने पेट घेतला.आग लागल्याचे पाहून टोलनाक्यावरील नागरिकांसह माळीवाडी व भोकरवाडी फाटयावरील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने कार विझवून, कारचे दरवाजे उघडून त्यातील पाच जणांना बाहेर काढले. यात पल्लवी वसंत सुरवसे, गोविंद वसंत सुरवसे, प्रथमेश बालाजी शिरसाठ हे तिघे जण गंभीररित्या भाजले, तर मीराबाई बालाजी शिरसाठ व प्रतीक बालाजी शिरसाठ हे किरकोळरित्या होरपळले.
हेही वाचा: Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'
टोलनाक्यावरील रूग्णवाहिकेचा चालक विजय धारकर, कर्मचारी गणेश चेडे, रवि गाढे यांनी सर्व जखमींना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रूग्नालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिपान काळे, परिचारीका उषा मिसाळ यांनी जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी टोलनाकयावरील १०३३ रूग्नवाहिकेने औरंगाबाद घाटीत हलविले. सदर कारने रस्त्याच्या मधोमध पेट घेतल्याने बराच वेळ औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी महामार्गावरील क्रेनव्दारे अपघातग्रस्त वाहनास एका बाजूला करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title: Burning Car On Dhule Solapur Highway Latest News In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..