esakal | Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'
sakal

बोलून बातमी शोधा

mental health

Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद: भूतकाळ आणि भविष्यकाळाचा अति विचार योग्य नाही. कोरोना काळात मनावर कसलेही दडपण न घेता शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवा. नॉर्मल रहा आणि संकटाला धैर्याने सामोरे जावे, असे प्रतिपादन मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ. संदीप शिसोदे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘कोविड-१९ नंतरचे जीवन’ या व्याख्यानमालेत ‘मी माझे विचार आणि कोविड-१९’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात डॉ. शिसोदे बोलत होते. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी उद्घाटन केले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते. डॉ. शिसोदे म्हणाले, माणसाला वर्तन नियंत्रण ठेवता येते पण मन, विचार यांच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड जात आहे.

हेही वाचा: धक्कादायक! आईने स्वतःच्या मुलांनाच फेकले घरावरून; चिमुरड्याचा मृत्यू

मनात चालणारे विचार जवळच्या व्यक्ती सोबत बोला. भीतीदायक वाटणारे नकारात्मक विचार कोणते? ते ओळखा, त्यावर कोणते विचार केले, म्हणजे माझी भीती, चिंता कमी होते. त्यावर लक्ष द्या. त्यांची पुनरावृत्ती करा. तसेच, काही भीतीदायक, नकारात्मक विचारावर स्व संरक्षण करणारे विचार काही वेळ वापरा, सतत वापर योग्य नाही. योगा, सात्विक, आहार व्यायाम करणे योग्य, इलेक्ट्रॉनिक माध्यमावरच्या अती बातम्या बघणे टाळा. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्लाज्मा दान करणार असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. अष्टपुत्रे यांनी केले. तर संजय शिंदे यांनी आभार मानले.

हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

हेल्पलाईन, कार्यगट स्थापन
कोरोनानंतरच्या आयुष्याला धैर्याने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन आणि कर्मचारी, प्राध्यापकांसाठी कार्यगट स्थापन करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केली. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित समस्या, प्रश्न तसेच समुपदेशनासाठी डॉ. डी. के. गायकवाड आणि डॉ. कैलास पाथ्रीकर हे कार्यगटाचे प्रमुख असतील. मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्पणा अष्टपुत्रे या विद्यार्थी हेल्पलाईनच्या प्रमुख असणार आहेत. समवेत डॉ. संदीप शिसोदे हेही विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत.

loading image