औरंगाबाद | कारमध्ये पुरुष-महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

घातपात की अपघात, यावर तर्कवितर्क
औरंगाबाद | कारमध्ये पुरुष-महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

औरंगाबाद : गांधेली परिसरातील निर्जनस्थळी उभ्या कारमध्ये महिला व पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा प्रकार बुधवारी (ता.१६) सायंकाळी उघडकीस आला. मात्र, ही घटना कशी घडली, याबाबत रात्री उशिरापर्यंत ठोस माहिती समोर आली नाही. असे असले तरी हा प्रकार घात की अपघात, या निष्कर्षापर्यंत पोलिस रात्रीपर्यंत पोचले नव्हते. मात्र, दोघे प्रेमीयुगुल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

निर्जनस्थळी उभी कार आतून जळालेल्या अवस्थेत असून मृतदेहही जळाले आहेत. या घटनेतील पुरुषाची ओळख पटली असून रोहिदास गंगाधर आहेर (४५, रा. जवाहरनगर) असे का विकसकाच्या नावावर असल्याचे तसेच मृत पुरुष हा विकसकाकडे कामाला असल्याची चर्चा सुरू होती.

याबाबत चिकलठाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : दुपारी दोनच्या सुमारास गांधेली शिवारात गुराख्यांना स्फोटासारखा आवाज ऐकू आला. काहीतरी विपरीत घडले असावे, या संशयातून गुराख्यांनी ही माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक गांधेली शिवारात पोचले. परिसराची पाहणी करताना निर्जनस्थळी पांढऱ्या रंगाची (एमएच-२०, डीजे-७२५९) चारचाकी उभी असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन पाहिले असता वाहनामध्ये एक महिला व एक पुरुष भाजलेल्या अवस्थेत पडलेले दिसले. पोलिसांनी दोघांनाही तातडीने घाटी रुग्णालयात हलविले.

मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घाटीतील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. मृत पुरुषाची ओळख पटली आहे. मात्र महिलेची रात्रीपर्यंत ओळख पटलेली नव्हती. ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळी वाहन सुरू होते. वाहनातील गॅसचा स्फोट झाला असावा, त्यामुळे वाहनांतील दोघेही होरपळले असावे. मृताच्या अंगावर मोठमोठे फोड आढळून आले आहेत. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल, अशी माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com