
छत्रपती संभाजीनगर : खरेदी-विक्री आणि पैशांचा व्यवहार भागीदारांवर सोपवणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच शेअर ट्रान्सफर करारनाम्यांचा गैरवापर करून जमीन खरेदी-विक्री भागीदारी संस्थेच्या माध्यमातून या व्यावसायिकाची तब्बल तीस कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर वर्ष २०२० ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घडला.