
छत्रपती संभाजीनगर : मका खरेदीच्या व्यवहारात तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यात कष्टाचे पैसे गेले. यामुळे तणावात आलेल्या व्यापाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दौलताबाद भागात घडला. याप्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध शुक्रवारी (ता. २०) गुन्हा नोंद झाला.